सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 एप्रिल 2024 (11:10 IST)

गाडीत बसण्याचा वादावरून एसटी चालकाला बेदम मारहाण ; व्हिडिओ वायरल

st buses
मनमाड :  सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बस स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत असतानाच बसमध्ये बसण्याच्या वादावरून बस चालकाला एका महिलेसह चार जणांनी जबर मारहाण केल्याची घटना मनमाड आगारात घडली.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, नासिकहून मनमाड कडे बस निघाल्यानंतर बस मध्ये चढलेल्या एका प्रवाशाला बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने बसण्याच्या जागी होऊन गाडीत वाद विवाद झाले या वादाचे रूपांतर मनमाड बस स्थानकात जबर हाणामारीत झाले यामध्ये एका महिलेसह चार जणांनी एसटी चालक आनंदा महादू नन्नवरे याला बेदम मारहाण केलेत चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये वायरल होत असून याप्रकरणी मनमाड पोलिस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 
Edited By - Ratnadeep Ranshoor