शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2017 (14:11 IST)

एसटी महामंडळ ओळख बदलणार, परिवर्तन बस येणार

एसटी महामंडळ ‘लाल डबा’ अशी ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे आधुनिक परिवर्तन बसला आकर्षक रंगसंगतीच्या माध्यमाने ताफ्यात समाविष्ट केले जाईल. अ‍ॅल्युमिनिअम बांधणीच्या बसेस वजनाने हलक्या असल्या तरी अपघातप्रसंगी या बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच प्रवाशांनाही गंभीर दुखापत होते. म्हणून पारंपरिक अ‍ॅल्युमिनिअमऐवजी मजबूत माइल्ड स्टीलच्या बसेस एसटी ताफ्यात चालवण्यात येणार आहेत. या बसची उंची ३.४ मीटरने वाढविण्यात आल्याने, प्रवासी सामान ठेवण्याच्या जागेत तिपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे पर्यायी चाक (स्पेअर व्हील) वाहक-चालकांना सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी बसवण्यात आले आहे.