शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अबब! स्टेट बँक ऑफ टोमॅटो..

टोमॅटोच्या वाढत्या किंमतींमुळे आता टोमॅटो बँकेच्या बातम्या व्हायरल होत आहे. मागील काही दिवसांपासून टोमॅटोची किंमत वाढतच जात आहे. यामुळे सरकार निशाण्यावर आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका बातमीनुसार टोमॅटोच्या किमतीत वृद्धी विरोधात काँग्रेसने एक विचित्र मार्ग शोधला आहे. काँग्रेसने लखनौ येथे ‘स्टेट बँक ऑफ टोमॅटो’ नावाने एक बँक उघडली आहे, ज्यात लोकं टोमॅटो जमा करवून त्याचं फिक्स डिपाजिट करवू शकतात.
 
एक किलो टोमॅटो जमा केल्यावर ही बँक सहा महिन्यात त्याहून दुप्पट टोमॅटो देईल. अर्थात एक किलो टोमॅटो जमा केल्यास आपल्याला सहा महिन्यात दोन किलो टोमॅटो परत मिळतील. या बँकेत टोमॅटो जमा करण्यासाठी लॉकरची व्यवस्थादेखील देण्यात आली आहे. 
 
काँग्रेसच्या या आगळ्या वेगळ्या विरोध प्रदर्शनात जनतेने मोठ्या प्रमाणात सामील होऊन बँकेत टोमॅटो जमा करवले. स्टेट बँक ऑफ टोमॅटो येथे आकर्षक सुविधादेखील देण्यात येत आहे. ज्यात टोमॅटो लॉकर, टोमॅटोवर 80 टक्के कर्जाची सुविधा आणि गरिबांनी टोमॅटो जमा केल्यास आकर्षक व्याज देणेही सामील आहे.
 
उल्लेखनीय आहे की काही दिवसांपूर्वी 20 रुपये किलो विकल्या जाणार्‍या टोमॅटोची किंमत आता 100 रुपये किलो पर्यंत पोहचली आहे.