1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जून 2022 (21:39 IST)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री फडणवीस शपथबध्द

State Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Fadnavis have been sworn in
गेले काही दिवस सुरु असलेल्या राज्यातील नाट्य़ाला अखेर विराम मिळाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असे जाहीर करून राजकीय बॉंब फोडला. दरम्यान संध्याकाळी राजभवनात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.
 
शपथविधी पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरुण आपल्या पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर शिंदे समर्थकांनी राज्यभरात विशेषता: ठाण्यात फटाके फोडून आनंद साजरा केला.