शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (09:24 IST)

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर ही कोंडी फुटली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं. या आवाहनाला कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर होते. राज्य कर्मचारी समन्वय संघटनांनी पुकारलेल्या या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या संपात सहभाग होता.