शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 मे 2024 (13:52 IST)

बाबासाहेबांचा फोटो फाडल्यावरुन आव्हाडांविरोधात राज्यभरात आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रायगडाच्या महाड येथे चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचं धन करत सरकार विरोधात आंदोलन केलं या वेळी त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या पोस्टरला फाडले. या प्रकारामुळे आणि आंदोलनामुळे अजित पवार गट आक्रमक झाला आहे. 
 
ठाण्यात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात अजित पवार गटाने आंदोलन केलं. आवाहाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. या बाबत आनंद परांजपे म्हणाले, महाड येथील चवदार तळ्याजवळ जे काही जितेंद्र आव्हाड यांनी केले त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेल्या पोस्टरला फेडण्याचे कृत्य केले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना महाड पोलिसांनी अटक करण्याची मागणी केली आहे. 
 
जितेंद्र आव्हाड यांचा विरोधात मनसे ही आक्रमक झाले असून नाशिक येथे मनसे कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आले आहेत. त्यांचे फोटो पायदळी तुडवत फोटोंची शेकोटी केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दिला आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा देत ज्या ठिकाणी पोस्टर फाडले तिथे जाऊन माफी मागावी असा इशारा दिला आहे.
 
यावरून राज्याचे राजकारण नव्यानं तापले असून आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले आहे जाहीर निषेध!जाहीर निषेध!स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी.
 
डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील, असंही ते म्हणाले आहेत.
 
यावरून जितेंद्र आव्हाडांनी जाहीर माफी मागितली असून ते म्हणाले, भावनेच्या भरात मनुस्मृतीविरुद्ध आंदोलन करत असताना मनुस्मृती हा शब्द लिहिला होता म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो आहे हे लक्षातच आले नाही. मनुस्मृती जाळू नये या साठी विरोधक राजकारण करत आहे. माझ्या हातून चूक झाली मी त्याची अत्यन्त लिन होऊन माफी मागतो, असे ते म्हणाले.