मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जुलै 2024 (16:48 IST)

पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

devendra fadnavis
सध्या पेपरफुटी प्रकरण खूप गाजत आहे. नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या बातम्यांवरून देशभरात खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पेपरफुटी वरून मोठे वक्तव्य समोर आले आहे. राज्य विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (शरदचंद्र पवार), भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आशिष शेलार आणि शिवसेनेचे भास्कर जाधव (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सरकार पेपरफुटीवर आळा घालण्या  साठी काही करणार का असा सवाल केला. पेपर लीक होत आहेत हे थांबवण्यासाठी काही कडक कायदा करणार का. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कायदा करण्यासाठी या अधिवेशनात विधेयक मांडले जाईल. असे सांगितले होते. 
 
NEET चा UG पेपर फुटल्याचा आरोप आणि इतर विविध परीक्षांमधील अनियमितता लक्षात घेता, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी सांगितले होते की, राज्य सरकारने प्रश्नपत्रिका फुटणे थांबवण्यासाठी कठोर कायदा करावा आणि दोषींना शिक्षा करणे आवश्यक आहे .
आज राज्य विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी कायदा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Edited by - Priya Dixit