रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (13:50 IST)

छत्रपती शिवरायांचा पुतळा-मुस्लीम जोडपं! व्हिडीओ व्हायरल

shivaji maharaj
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. प्रत्येकाला त्यांचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राला वेगळी ओळख आहे. त्यांचे नाव घेताना मनात अभिमान वाटतो. मराठी माणसालाच नाही तर महाराष्ट्रातात राहणाऱ्या प्रत्येकाला महाराजांचा आदर आणि अभिमान वाटतो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक मुस्लिम जोडपं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर जलाभिषेक करून त्याला पुसून त्यावर मोठा हार घालून महाराजांना अभिवादन करतो.

तर त्याच्या सोबत बुरखा घालून असलेली बाई महाराजांच्या पुतळ्याला ओवाळते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकले नाही. 
24 सेकंदाच्या या व्हिडिओला 22 हजार पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक केले आहे. 
 
Edited by - Priya Dixit