1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Stone pelting on Ram Navami procession in Shrirampur city

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक; एफआयआर दाखल

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीची मिरवणूक काढण्यात येत होती. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास, मिरवणूक सय्यद बाबा चौकातील मशिदीसमोरून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. मिरवणूकवर मशिदीच्या मागून अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत तीन जण जखमी झाले. जखमींपैकी एक जण गंभीर जखमी असून त्याला श्रीरामपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दगडफेकीमुळे मिरवणुकीत गोंधळ निर्माण झाला. जमाव संतप्त झाला आणि काही काळासाठी परिस्थिती तणावपूर्ण झाली.
पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणून जमावाला पांगवले. जमावाला समजावून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात मशिदीच्या मौलवीसह १० ते १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे. सध्या परिस्थिती शांत असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.  पोलिसांनी या प्रकरणी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
अशोक खरात यांना पक्षाघाताचा झटका आला होता, तपासात उत्तेजक औषधांच्या वापराची पुष्टी, नाशिक पोलिसांचा मोठा खुलासा