1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नागपूर , शुक्रवार, 27 मार्च 2020 (13:22 IST)

वादळी पावसाने विदर्भाला झोडपले

Stormy rain
कोरोनामुळे धास्तावलेल विदर्भवासियांपुढे आता पुढील काही दिवस वादळीपावसाचेही आव्हान आहे. मध्य रात्री विदर्भात नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी तर  गारपीटसुद्धा झाली आहे. यामुळे पीकांचेही नुकसान झाले आहे.

सोमवारपर्यंत विदर्भात ही परिस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे विदर्भवासियांनी पुढील काही दिवस आपल्या प्रकृतीची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.