शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 21 मार्च 2020 (17:00 IST)

आताच मदत करा, जबरदस्तीची वेळ आणू नका :तुकाराम मुंढे

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने चार शहरं लॉकडाऊन केली आहेत. मात्र तरीही रस्त्यावरील गर्दी न हटल्याने, नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे अक्शन मोडमध्ये  आले आहेत. “विनंती करुनही घराबाहेर पडत असाल तर आम्ही जबरदस्तीने तुम्हाला घरी बसवू, ती वेळ आणू नका, आता विनंती करतोय, जबरदस्ती करायला लावू नका, आताच मदत करा, जबरदस्तीची वेळ आणू नका” असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावून सांगितलं.
 
लॉकडाऊनचा अर्थ केवळ दुकानं आणि कार्यालये बंद करणे असा नाही, तर लोकांनीही घराबाहेर न पडणे असा आहे. मात्र  अजूनही रस्त्यावर अनेक गाड्या, लोक दिसत आहेत. लोकांनी घरी बसणे गरजेचं आहे, वारंवार आवाहन करुनही नागरिकांना गांभीर्य नाही हे दु:खद आहे, अशी खंत तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.