बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (07:12 IST)

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.गेल्या वर्षीच्या परीक्षेत नापास झालेल्या 97 हजार विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे पेपर चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं समोर आलं आहे. 
 
विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या पुनर्मूल्यांकनाच्या इतिहासातील हा सर्वाधिक आकडा आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये 2014 ते 2016मध्ये जवळपास 73 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासल्या गेल्याचं समोर आलं होतं. 2017च्या दुस-या सत्रातही जवळपास 47,717 विद्यार्थ्यांनी 76,086 उत्तर पत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. ज्यात 18,254 विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं.