रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (21:19 IST)

विद्यार्थ्यांना आता या तारखेपासून या तारखेपर्यंत सुट्ट्या

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर उन्हाळी सुट्यांची घोषणा केली आहे. एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याची परवानगी शिक्षण विभागाने शाळांना दिली होती. त्यामुळे उन्हाळी सुट्या कधीपासून लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर त्याचा आज खुलासा झाला आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने ऑफलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. आता एप्रिल महिन्यात शाळा सुरू राहणार असून उन्हाळी सुट्या २ मे पासून मिळणार आहेत. तसेच, पुढील शैक्षणिक वर्ष हे १३ जूनपासून सुरू होणार आहे. म्हणजेच, २ मे ते १२ जून या काळात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या असणार आहेत.

मात्र, विदर्भातील शाळा या २७ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक राहत असल्याने विदर्भात उन्हाळी सुट्या अधिक दिवस देण्यात आल्या आहेत. तर,गणेशोत्सव, नाताळ आणि दिवाळी या काळात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीतील सुट्ट्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर शैक्षणिक विभागाला अधिकार देण्यात आले आहेत.