1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (15:19 IST)

गुढीपाडव्याच्या दिवशी नाशकात पेट्रोल पंप राहणार बंद; कारण हे आहे

Petrol pump in Nashik will be closed on Gudipadwa
विनाहेल्मेट चालकाला जो पेट्रोल पंप चालक पेट्रोल देईल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिल्यानंतर पेट्रोल पंप चालक आक्रमक झाले आहे. आयुक्तांचा हा निर्णय सक्तीचा असल्यास आम्ही गुडीपाडव्यादिवशी पेट्रोल पंप बंद ठेवू अशी भूमिका पेट्रोलपंप चालकांनी घेतली आहे. त्यामुळे गुडीपाडव्याला वाहना चालाकांचे हाल होणार आहे. याअगोदरच पेट्रोलपंप चालकांना विनाहेल्मेट पेट्रोल देऊ नये या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. पण, यावेळेस जे पेट्रोल पंप विना हेल्मेट असलेल्या चालकाल पेट्रोल देतील. त्या पेट्रोलपंप चालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गृहीत धरून कारवाई करण्यात येईल. एकापेक्षा जास्तवेळी नियमाचे उल्लंघन झाल्यास तो पेट्रोल पंप धोकादायक समजून बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिल्यामुळे पेट्रोलपंप चालक आक्रमक झाले आहे.