रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (08:14 IST)

शेताला पाणी द्यायचं होत म्हणून, तो मोटार चालू करायला गेला..!

नाशिक : पिकाला पाणी देण्याकरिता विद्युत मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या सोळा वर्षीय मुलास विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे ही घटना घडली.
 
करण बाळू तळे (१६) असे या मुलाचे नाव आहे. येवला तालुक्यातील डोंगरगाव येथे तळे कुटुंबीय राहत आहे. दरम्यान काल (दि.२४) दुपारच्या सुमारास करण पिकाला पाणी देण्यासाठी वीज पंप चालू करत असताना त्याला मीटर पेटी व्दारे विजेचा जबर धक्का बसला. विजेच्या धक्क्यानंतर तो खाली कोसळला. याबाबत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती होताच घटनास्थळी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.
 
यावेळी बेशुद्ध अस्वस्थेत असताना करणे चुलते संजय तळे यांनी तात्काळ त्यास येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉ. सोनवणे यांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, करणचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.