गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (23:02 IST)

शरद पवारांच्या नातवाचा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल; अभिनेत्री कोण ?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांचे नातू व उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार  यांचा एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोसोबत या अभिनेत्रीचा आणि जय पवार  याचा संबंध काय असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे नेमकी ही अभिनेत्री कोण आहे याविषयी जाणून घेऊयात…
 
जय पवार यांचा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. ही बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला  आहे. उर्वशीसोबतच्या जय यांच्या एका फोटोने सध्या सोशल मीडिया व्यापून टाकलाय. या फोटोत तिच्या शेजारी जय आणि उर्वशीचा कॉमन मित्र आणि या मित्राच्या शेजारी जय उभे आहेत. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. दरम्यान या फोटोवरून बातम्य़ा झाल्यानंतर हा फोटो काढून टाकण्यात आला आहे.
 
बॉलिवूडमधली अभिनेत्री उर्वशी रौतेलाने हेट लव्ह स्टोरी 4, सनम रे, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, पागलपंती, साईझ झिरो, मिस मॅच इंडिया, अंबरसरिया, ब्लॅक रोज, भाग जॉनी या सिनेमांमध्ये काम केलं आहे.