399 वर्षांची जगातील सर्वात वृद्ध महिला, फोटो व्हायरल
सोशल मीडियावर अनेक विचित्र आणि आश्चर्य जनक बातम्या व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर जगातील सर्वात वृद्ध महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये या महिलेचे डोळे आत गेल्याचे दिसत आहे त्वचा देखील वेगळी दिसत आहे. ही महिला जगातील सर्वात वृद्ध महिला असल्याचे म्हटले जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिलेचे वय 399 आहे. आणि ही महिला गेल्या चार शतकांपासून जिवंत आहे. काहींनी असे म्हटले आहे की हा फोटो एका बौद्ध भिक्षुचा आहे. आणि हा स्वतःला ममी मध्ये बदलत आहे. या फोटोचा शोध घेतल्यावर ही फेक न्यूज असल्याचे समजले. लुआंग फो आय असं या व्यक्तीचे नाव असून ते बौद्ध भिक्षु होते. त्यांचं खरं वय 399 नसून 109 वर्ष आहे. ते थायलंड येथे वास्तव्यास आहे. आणि ते रुग्णालयातच बराचसा वेळ घालवतात. आणि स्वतःची कामे स्वतः करतात.
हा फोटो एका युजरने टिकटॉक वर शेअर केला .तो युजर या व्यक्तीची नातं असल्याचे समजले. सध्या जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती असल्याचा 'किताब जपानच्या केन तनाका यांच्या नावावर आहे. त्यांचे वय 119 वर्ष आहे.