मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 4 मार्च 2022 (22:09 IST)

रशियन सैन्याच्या गोळीबारात पासपोर्टमुळे वाचला जीव

युक्रेनवर रशियन  सैन्याने कहर सुरूच ठेवला आहे.रशियन सैन्याने गजबजलेल्या शहरी भागांवर हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनमधील एका सोळा वर्षांच्या मुलाच्या खिशात ठेवलेल्या पासपोर्टने रशियन सैनिकांच्या गोळीबारापासून त्याचा जीव वाचवला आहे.

 गोळीबाराची ही घटना युक्रेनच्या मारियुपोल शहरातून घडली आहे. हा पासपोर्ट 16 वर्षाच्या मुलाचा आहे, पासपोर्टमुळे मुलाचे प्राण वाचले. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तो अजूनही रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी युक्रेनने पुन्हा एकदा दावा केला आहे की आता रशियन सैन्य देखील नागरिकांना लक्ष्य करत असून त्यांच्यावर जोरदार गोळीबार करत आहे. 
 
या पासपोर्टचे छायाचित्र युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आले आहे. त्यावर लिहिले होते, 'युक्रेनच्या पासपोर्टमध्ये गोळीचा तुकडा अडकला आहे. त्यामुळे एका 16 वर्षाच्या मुलाचा जीव वाचला. या मुलावर आता शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. सध्या शहरात गोळीबार सुरू आहे. पासपोर्टमध्ये छिद्र झाल्याचे दिसत आहे.