गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (08:08 IST)

जळगाव जिल्हा ग.स.रणधुमाळी : पहिल्याच दिवशी १४९ अर्जांची विक्री तर ११ इच्छूक उमेदवारांनी भरले अर्ज

Jalgaon District GS: 149 applications sold on the first day and 11 aspiring candidates filled up जळगाव जिल्हा ग.स.रणधुमाळी : पहिल्याच दिवशी १४९ अर्जांची विक्री तर ११ इच्छूक उमेदवारांनी भरले अर्जMaharashtra Regional News In Webdunia Marathi
ग.स.सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आज पहिल्याच दिवशी तब्बल १४९ अर्जांची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे यंदा ५ पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले असून निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. पहिल्याच दिवशी ११ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
 
गेल्या अनेक महिन्यांपासून उत्सुकता लागून असणार्‍या सरकारी नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या अर्थात ग.स.सोसायटीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १४९ अर्जांची विक्री होऊन ११ अर्ज उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. पहिल्या दिवशी नथ्थू पाटील, उदय पाटील, सुनील पाटील २ अर्ज, संदीप पवार, शैलेश राणे, गणेश पाटील, प्रवीण पाटील, अनिल सुरडकर, महेश पाटील, राम पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.
 
ग.स.सोसायटीच्या २१ जागांसाठी ५ पॅनल उभे ठाकले आहेत. ग.स.सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आजपासून अर्ज विक्री आणि अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी २५ ते ३१ मार्च या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यांची छाननी झाल्यानंतर २८ एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून ३० एप्रिल रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्याने हालचाली गतीमान झाल्या आहेत.
 
यंदाच्या निवडणुकीत एकूण ३२ हजार ३०० मतदार असून ज्यातील १७ हजार मतदार हे शिक्षक आहेत. २१ संचालकांच्या जागेसाठी मतदान पार पडणार असून त्यात राखीव जागेत ५ स्थानिक, ११ बाहेरील, २ महिला, १ एस.सी, १ वि.भ.ज तर १ ओबीसी जागेचा समावेश आहे. निवडणुकीत ५ पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले आहे. निवडणुकीत लोकमान्य पॅनल विलास नेरकर, सहकार पॅनल उदय पाटील, लोकसहकार पॅनल मनोज पाटील, प्रगती पॅनल रावसाहेब पाटील, स्वराज पॅनल आर.के.पाटील यांचे पॅनल रिंगणात आहे.