सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (13:48 IST)

अंत्यविधीसाठी आलेल्या सासूवर जावयाने केला बलात्कार, विष पाजण्याची धमकी दिली

नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे ज्यात जावयाने सासूवर बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सप्टेंबर महिन्यात पीडित महिलेच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी नाशिककला आलेल्या सासूवर जावयाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी मावस सासू अमरावतीहून नाशिकला आली होती. संशयित जावयाने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून साडीचोळी करण्याचा बनाव केला. संशयित नितीन वाणी मावस सासूला 27 सप्टेंबर 2021 रोजी भारतनगरमधील घरी घेऊन आला. त्याने मध्यरात्री अडीच वाजेदरम्यान झोपेत सासूचा गळा दाबून जागे केले नंतर त्यांना विषाची बाटली दाखवून बलात्कार केला. यावेळी त्याने सासूचे अश्लील फोटो देखील काढले. नंतर त्याने 1 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये अश्लील फोटो दाखवून सासूवर बलात्कार केला. 
 
पीडित सासू अमरावती परतली तर तो अमरावती येथील सासूच्या घरी आला. घरात सासू एकटी असताना त्याने पुन्हा अश्लील फोटो व विषाची बाटली दाखवून बलात्कार केला. जावयाचा त्रास असहाय्य झाल्याने पीडित सासूने 7 डिसेंबर 2021 रोजी अमरावतीमधील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात येऊन जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. 
 
प्रथम घटना नाशिकमधील मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा वर्ग करण्यात आला. या प्रकरणी संशयित नितीन हा अद्याप फरार असून पुढील तपास मुंबईनाका पोलिसांकडून केला जात आहे.