सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (11:05 IST)

सोलापुरात ड्रेनेज मध्ये विषारी वायूमुळे गुदमरून 4 कामगारांचा मृत्यू

सोलापूर -अक्कलकोट मार्गावर मुख्य ड्रेनेज मध्ये उतरून काम करणाऱ्या चार कामगारांचा विषारी वायूत गुदमरून मृत्यू झाला तर दोघे बेशुद्ध झाले. बेशुद्ध कामगारांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
चार मयत झालेल्या कामगारांपैकी दोघांची ओळख पटलेली असून बैचन परमू ऋषिंदेव  राहणार बिहार वयवर्षे 36 आणि आशिषकुमार भारतसिंग राजपूत वय वर्ष 17 राहणार उत्तरप्रदेश असे यांची नावे  आहेत. तर इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. 
हा अपघात गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास झाला. प्रथम ड्रेनेजमध्ये उतरलेले कामगार विषारी वायूमुळे बेशुद्ध पडले. त्यांच्या मदतीसाठी तिघे चोघे जण खाली उतरले .त्यापैकी दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. तर इतर दोघे बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेजमध्ये शोध घेतल्यावर त्यांना मृतदेह सापडले. नंतर दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळले. हे ड्रेनेज 15 फूट खोल असून त्यात सुमारे साडेतीनफीट पाणी होते. कामगारांचा विषारी गॅस मुळे गुदमरून मृत्यू झाला.