मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (10:02 IST)

राज्यात 2 वर्षाच्या मुलाला ओमिक्रॉन पितालाही लागण झाली

राज्यात कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरियंट  ने चिंता वाढवली आहे. सध्या राज्यात ओमिक्रोन ओमिक्रॉन व्हेरियंट आपले पाय पसरत आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे आता पर्यंत 23  रुग्ण आढळून आले आहे. राज्यात उस्मानाबाद मध्ये कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमिक्रॉन व्हेरियंटचे आणखी 2 रुग्ण आढळून आले असता. त्यात 31 वर्षीय पिता आणि 2 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या पिता पुत्राला कोरोनाची लागण झाली होती. सदर व्यक्ती घाना देशातून आली होती. या 31 वर्षीय आणि 2 वर्षाच्या मुलाचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात आता ओमिक्रॉन व्हेरियंट बाधितांची एकूण संख्या 5 झाली आहे .
गुरुवारी, एकाच दिवसात ओमिक्रॉनची सर्वाधिक 23 प्रकरणे नोंदवली गेली. राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 88 झाली आहे. बुधवारी ओमिक्रॉन  चे एकही रुग्ण आढळले नाही.