शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (11:56 IST)

दीर्घ श्वास घेणं महत्त्वाचं, पद्धत आणि फायदे जाणून घ्या

कोरोना काळात दीर्घ श्वासाला किती महत्त्व आहे हे सर्वांना कळून आलं आहे. योग्य पद्धतीने श्वासोच्छवास करणं फायदेशीर असल्याचं जाणवतं आहे. सध्याच्या काळात श्वास घेण्याची योग्य पद्धत आत्मसात करण्यावर अधिक भर देत असल्याचं दिसून येत आहे. याने अधिकाअधिक ऑक्सिजन शरीरात घेता येईल. याने रक्तप्रवाह सुरळीत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासाठी योग्य पद्धत जाणून घ्या-
 
खोल श्वास घेण्याची पद्धत
आरामात बसून नाकात श्वास घेत असताना हळूहळू पोट हवेने भरा. नंतर आपल्या नाकातून हळूहळू वारं काढून टाका. ही क्रिया करत असताना एक हात आपल्या पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा. आपण आडवे होऊन देखील ही क्रिया करु शकता. हळूहळू श्वास घेत असताना पोटात हवा भरण्याची क्रिया जाणवते. त्याच वेळी, श्वासोच्छ्वास घेताना, आपण पोटात जात असल्याचे देखील जाणवते.
 
जितकं श्वास घेणं आवश्यक आहे तितकंच काही वेळ श्वास रोखून धरणं हे देखील आवश्यक आहे. जेव्हा आपण खोल श्वास शरीरात घेतो आणि फुफ्फुसात भरलेला हा ऑक्सिजन काही काळासाठी तसाच शरीरात रोखून धरतो तेव्हा प्रक्रियेमुळे आपल्या फुफ्फुसांना मजबूती मिळते.
 
अनेकांना तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. परंतू तोंडाने नव्हे तर नाकाने श्वास घ्यावी. नाकाने श्वास घेतल्याने हवेतील विषाणू श्वसननलिकेत जाऊ शकत नाहीत. 
 
खोल श्वास घेण्याचे फायदे
 
ताण कमी होतो
तणाव टाळण्यासाठी खोल श्वास घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे आपल्या शरीराला पुरेसा ऑक्सिजन प्रदान करतं आणि आपण चिंता मुक्त होता.
 
हृदयासाठी फायदेशीर
दीर्घ श्वास घेतल्यास हृदयाची कार्यक्षमता वाढते. याने चरबी कमी होण्यास देखील मदत होते.