रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शुक्रवार, 7 मे 2021 (18:36 IST)

Fact Check: उदान मुद्रेने ऑक्सिजन पातळी वाढते तज्ञांचे मत जाणून घ्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात उच्छाद मांडले आहे. या लाटेचा दुष्प्रभाव म्हणजे या मध्ये रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच देशभरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्ण दगावले आहे. दरम्यान सोशल मीडियावर दररोज ऑक्सिजनची पातळी वाढविण्याचे काही नवीन व्हिडीओ वायरल होतात. अशाच एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की उदान मुद्रा केल्याने ऑक्सिजनची पातळी वाढते.
 
काय आहे या वायरल पोस्ट मध्ये- या मध्ये उदान मुद्राची फोटो शेयर करून लिहिले आहे की ''रुग्णांना उदान मुद्रा करण्यासाठी सांगा, हे ऑक्सिजनची पातळी त्वरितच वाढवते. सर्व रुग्णांनी हे दिवसातून किमान 2 किंवा 3 वेळा करावे . आयुर्वेदाचे डॉक्टर आयसीयू मध्ये भरती झालेल्या रूग्णांना ही मुद्रा करण्यासाठी म्हणत आहे. आणि त्यांना याचा उत्तम परिणाम मिळत आहे.  
 
खरं काय आहे- 
या वायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी वेबदुनियाने योग तज्ञाशी 
चर्चा केली. जाणून घेऊ या ते काय म्हणतात. 
 
योगाचार्य डॉ. दक्षदेव गौड़ यांनी सांगितले की असं मानले जाते की उदान मुद्रा केल्याने ऑक्सिजन पातळी वाढते, परंतु वैज्ञानिक दृष्टया याचे काही प्रमाण नाही. 
 
तसेच, योगा तज्ज्ञ विनिता शर्मा सांगतात की उदान मुद्रा हे मुळात थॉयराइडशी संबंधित सर्व आजारात फायदा देतो .या मुळे ऑक्सिजन पातळी तर वाढतेच परंतु याचा सह इतर योगा आणि प्राणायाम केले तर ते फायदेशीर ठरतील.