शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (17:10 IST)

कोणते फळ भाज्यांचे साल आपण खाऊ शकता जाणून घ्या

काही फळ भाज्या अश्या असतात ज्यांच्या सालींमधे देखील खूप पोषक घटक असतात.या फळ भाज्यांचे साल देखील आपण खाऊ शकतो. चला तर मग जाणून घेउ या कोणते आहे हे फळ -भाज्या.
 
1 गाजर - गाजर गाजर खाल्ल्याने डोळ्याची दृष्टी वाढते. तसेच कर्करोग होण्याचा धोका देखील कमी होतो. गाजर मध्ये व्हिटॅमिन बी 6,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए ,मॅग्नेशियम,पोटॅशियम आणि इतर पोषक घटक आढळतात. या व्यतिरिक्त या मध्ये बीटा केरोटीन आढळतं जे त्वचेवर सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी करतो. 
 
2 सफरचंद - या मध्ये मुबलक प्रमाणात खनिज आणि व्हिटॅमिन आढळतात. सफरचंदाच्या सालींमधे असं फायबर आहे जे शरीरातील बेड कोलेस्ट्रॉल कमी करून साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. 
 
3 बटाटा -या मध्ये आयरन मुबलक प्रमाणात असते या मुळे अशक्तपणा
होण्याचा धोका कमी होतो. बटाट्याचे साल हे मेटाबॉलिज्म व्यवस्थित ठेवतात आणि नर्व्ह मजबूत करतात. 
 
4 केळी- केळीच्या सालात व्हिटॅमिन,मिनरल्स,प्रथिने, अँटी फंगल, फायबर इत्यादी पोषक घटक आहे. हे रक्त स्वच्छ करण्यात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा करण्यात मदत करतात. या मध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे घटक आहे या मुळे चांगली झोप येते. 
 
5 वांगी - वांगीच्या सालींमधे नेसोनीनं नावाचे अँटिऑक्सिडंट आढळते जे मेंदू आणि मज्जासंस्थेचा कर्क रोग होण्यापासून बचाव करतो.  
 
6 काकडी -काकडी सालींसह खावे या मुळे शरीरात कॅल्शियम, फास्फोरस,मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन के ची कमतरता पूर्ण करण्यात मदत करते.