बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (22:46 IST)

ऑक्सिमीटरचा वापर कधी आणि कसा करावा जाणून घ्या तज्ज्ञाचा सल्ला

नवीन रंगियाल 
कोरोना संसर्ग वाढल्या पासून प्रत्येकाला आपल्या ऑक्सिजनच्या पातळीची काळजी आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक जण मेडिकल स्टोअर मधून ऑक्सिमीटर घेऊन आपल्या ऑक्सिजन पातळीची तपासणी करत आहे. या साठी हे जाणून घेणं महत्वाचे आहे की या ऑक्सिमीटरचा वापर कसा आणि कधी करायचा आहे. ही माहिती देण्यासाठी वेबदुनियाने विशेष करून आपल्या पाठकांसाठी डॉ. किरणेश पांडे यांच्या समवेत चर्चा करून ऑक्सिमीटरच्या वापर करण्याबद्दलची माहिती घेतली. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
डॉ पांडे म्हणाले की, संसर्गाच्या या काळात सुमारे 85 टक्के लोक देखील बरे होऊ शकतात.जे खूपच गंभीररीत्या आजारी आहे त्यांना रुग्णालयात जाण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्या लोकांमध्ये संसर्गाचे लक्षण कमी आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. घरातच राहून संसर्गाची कारणे तपासा.या वेळी ऑक्सिमीटरची गरज असते. असेही ते म्हणाले.
 
डॉ. पांडे यांच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला अस्वस्थता जाणवत आहे तर सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्या आणि बघा की गेल्या 5 दिवसांपासून आपले आरोग्य स्थिर आहे की अस्वस्थता अधिक जाणवत आहे. अशा परिस्थितीत पल्‍स ऑक्सिमीटरची गरज असते.ते वापरावे. 
 
पल्‍स ऑक्सिमीटर कसे वापरावे ? 
* ऑक्सिमीटर दररोज वापरा.
* नेलपेंट काढून घ्या. 
* एकाच बोटात लावून तपासण्या ऐवजी हातातील  इतर बोटांमध्ये देखील लावून बघा. 
* ऑक्सिमीटर लावल्यावर थोड्यावेळ तसेच राहू द्या. 
* दोन तीन वेळा तपासल्यावर जी सर्वात जास्त रिडींग येईल त्यालाच बरोबर मानावे.
 
हा उपाय प्रभावी आहे- 
* किमान सहा मिनिटे वॉक करा. नंतर ऑक्सिमीटरचा वापर करून ऑक्सिजनची पातळी तपासा. 
* वॉक केल्यावर देखील ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी 4 टक्क्याने खाली येते तर आपल्याला पुढील चाचणीची गरज आहे. 
* वॉक केल्यावर देखील ऑक्सिजनची पातळी 94 च्या वर येत आहे तर काळजी करण्याची काहीच गरज नाही. आपण बरे आहात.
 
संसर्गाला कसे ओळखावे- 
* आपल्या लक्षणांकडे लक्ष द्या. 
* आराम करा.
* चांगले आहार घ्या.
* काळजी करू नका.
* या नंतर देखील अस्वस्थता जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावे.