मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (15:09 IST)

ट्रेडमिल वापरताना हँडल धरावं किंवा नाही...

जीममध्ये गेल्यावर ट्रेडमिलवर धावण्याला अनेकांची पसंती असते. अनेकांच्या घरातही ट्रेडमिल असतं. आता हे ट्रेडमिल वापरताना त्याचे हँडल धरावं किंवा नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात ट्रेडमिलवर व्यायाम करताना हँडल धरणं योग्य नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ट्रेडमिलचं हँडल फक्त तुमच्या सुरक्षेसाठी असतं. हँडल धरल्याने आपण खूप जोरात धावत आहोत, असं तुम्हाला वाटतं. पण याचा परिणाम तुमच्या शरीरातल्या ऊर्जेवर होत असतो. हँडल धरून धावल्यामुळे तुम्हाला  दमल्यासारखं वाटतं.
 
हँडल धरल्यामुळे धावणं किंवा चालण्याचे जे लाभ तुम्हाला मिळतात त्याचा काहीच उपयोग होत नाही, असंही तज्ज्ञ सांगतात. 
ट्रेडमिलवर व्यायाम करताना हँडल धरल्याचे बरेच दुष्परिणाम आहेत. पहिलं म्हणजे तुम्ही खूप कमी कॅलरी खर्च करत, शरीराचं संतुलन साधू शकत नाही.
हँडल धरल्यावर तुमच्या हातांची हालचाल होत नाही. धावताना किंवा चालताना हातांची हालचाल होणं महत्त्वाचं असतं. शरीर पुढच्या बाजूला झुकण्याच्या दृष्टीने हातांची हालचाल महत्त्वाची असल्याचं तज्ज्ञांचंम्हणणं आहे. 
ट्रेडमिलची गती खूपच जास्त असेल तर हँडल धरल्याने तुम्ही पडू शकता. हँडल धरल्याने होतं काय की तुमच्या पायांवरचा ताण कमी होतो. पण शरीराच्या वरच्या भागावरचा ताण वाढतो. याचा परिणाम शरीराच्या खालच्या भागाच्या कार्यक्षमतेवर होतो. त्यामुळे तुम्ही बाहेर जसे धावता तसंच ट्रेडमिलवर धावायला हवं.