मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (13:35 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचा कोरोनाने मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
 
नर्मदाबेन मोदी असं मोदी यांच्या काकूचं नाव होतं. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्या अहमदाबादमधल्या राणीप भागात मुलांसमवेत राहात असत. त्यांचे पती जगजीवनदास मोदी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वडील दामोदरदास मोदी यांचे सख्खे बंधू होत. जगजीवनदास यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं आहे.
 
नर्मदाबेन गेल्या 10 दिवसांपासून अहमदाबादच्या सिव्हील रुग्णालयात उपचार घेत होत्या. पण प्रकृती खूपच जास्त खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला, असं प्रल्हाद मोदी यांनी सांगितलं.