शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (16:24 IST)

आम्ही ती रेमडेसिवीर भाजपसाठी खरेदी करणार नव्हतो : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे रेमडेसिवीर इंजेक्शन वितरीत करणाऱ्या फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात गेले होते. यावर माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून फडणवीसांवर याप्रकरणी टीका केली आहे. याला आता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. रेमडेसिवीरसाठी पोलीस स्टेशनला का गेले याचं उत्तर फडणवीस यांनी इंडियन एक्सप्रेसला लिहिलेल्या लेखातून दिलं आहे.
 
राज्याला जास्तीत जास्त रेमडेसिवीर मिळावेत हाच आमचा हेतू होता. राज्याला मदत करणाऱ्या व्यक्तीचा छळ होऊ नये यासाठी पोलीस स्टेशनला गेलो होतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही ती रेमडेसिवीर भाजपसाठी खरेदी करणार नव्हतो. आमचा फक्त समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न होता, असं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीने चुकीच्या गोष्टी पसरवल्या असून जो चुकीचा प्रचार केला, असं देखील फडणवीस म्हणाले.