बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 28 एप्रिल 2021 (13:32 IST)

ऑक्सिजन खरेदीसाठी ब्रेट लीने केली 43 लाखांची मदत

कोरोना संकटाशी लढा देत असलेल्या भारताच्या मदतीला जगभरातील अनेक देश धावून येत आहेत. क्रिकेटपटूही यामध्ये मागे नाहीत. सोमवारी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सनं 50 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 37 लाखांची मदत केली होती.
 
पॅट कमिन्सनंतर आता ब्रेट ली यानेही भारताला कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत केली आहे.
 
ब्रेट लीने ऑक्सिजन खरेदीसाठी भारताला 1 बिटकॉईन म्हणजेच 43 लाखांची मदत केली. ब्रेट लीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. भारत हे माझं दुसरं घर आहे, असं ब्रेट ली म्हणाला.
 
क्रिकेटमधील कारकीर्द आणि निवृत्तीनंतर इथल्या लोकांचं माझ्या मनात विशेष स्थान आहे. आपल्याला एकत्र येऊन लढण्याची गरज ब्रेट लीनं व्यक्त केली.