1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: दुबई , बुधवार, 7 एप्रिल 2021 (13:30 IST)

आयसीसी क्रमवारी : झुलन गोस्वामी व स्मृती मंधाना आपल्या स्थानावर कायम

ICC rankings
भारताची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना, वेगवान गोलंदाज  झुलन गोस्वामी व अष्टपैलू दीप्ती शर्मा आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत आपल्या स्थानावर कायम आहेत. तर शिखा पांडेने अव्वल10 मध्ये पुनरागमन केले आहे. मंधाना 710 गुणांसह सातव्या स्थानी कायम आहे. तर कर्णधार मिताली राज फलंदाजांच्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.
 
इंग्लंडची टॅमी ब्युमेंट अव्वलस्थानी आहे. गोलंदाजीत गोस्वामी 681 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. तर पूनम यादव आठव्या स्थानावर व शिखा दहाव्या स्थानावर आहे. शिखा फेब्रुवारी 2019 मध्ये कारकिर्दीच्या सर्वोत्कृष्ट पाचव्या स्थानावर होती.
 
अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये दीप्ती शर्मा एमकेव भारतीय खेळाडू आहे जी 343 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली तिसर्या. स्थानावर आहे. गोलंदाजांमध्ये मेगान शट दुसर्याय स्थानावर पोहोचली आहे. तर मरिजाने काप तिसर्याग स्थानावर घसरली आहे.