बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 5 एप्रिल 2021 (14:25 IST)

गुजरातचे माजी डीजीपी शब्बीर हुसेन यांना BCCIच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नवे प्रमुख नियुक्त केले

गुजरातचे माजी डीजीपी शब्बीर हुसेन एस खांडवाला यांना बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक (एंटी करप्शन) विभागाचे नवे प्रमुख केले गेले आहे. ते अजितसिंगची जागा घेतील. 31 मार्च रोजी अजित यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, परंतु नवीन चीफला मदत करण्यासाठी ते काही दिवस काम करत राहतील. शब्बीर हुसेन यांनी या पदावर निवडून आल्याबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की ही बाब त्यांच्यासाठी अभिमानास्पद आहे.
1973 आयपीएस अधिकारी शब्बीर हुसेन खंडवाला यांची 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या सत्रापूर्वी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावर ते म्हणाले, 'जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयचा मी एक भाग होत आहे ही फार अभिमानाची बाब आहे. या कामातील सुरक्षिततेच्या प्रश्नावरील माझ्या अनुभवाचा फायदा मला मिळेल. डिसेंबर 2010 मध्ये ते गुजरातचे डीजीपी म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर दहा वर्षांपासून एस्सार या गटाचे सल्लागार आहेत. ते केंद्र सरकारच्या लोकपाल शोध समितीचे सदस्यही होते. ते बुधवारी चेन्नईला जातील. यापूर्वी त्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा वनडे सामनाही पाहिला होता. राजस्थानचे माजी डीजीपी अजित सिंग यांनी एप्रिल 2018 मध्ये हे पद सांभाळले होते.