शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (16:01 IST)

बांधकाम साइटवर 11 फूट मगर आढळल्याने खळबळ

गुजरातच्या वडोदरा येथे इमारतीचं बांधकाम करण्यासाठी खोदकाम चालत असताना अचानक 11 फूट मोठी मगर आढळ्याने खळबळ उडाली. त्यानंतर काही काळ काम ठप्प करण्यात आलं.
 
मिळालेल्या माहितीनुसार इमारतचं खोदकाम करत असताना कामगारांनी मगर बघिलत्यावर काम थांबवण्यात आले. नंतर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगरीचं सुरक्षित रेस्क्यु केले आहे. नंतर मगरीला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले आहे.
 
या घटनेत मगरीला कोणतीही इजा न करता पकडण्यात आले आहे. घटनास्थळी वनविभागाचे डॉक्टर पोहोचले होते. त्यांनी मगरीची तपासणी केली तसेच मगर पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सांगितले.
 
माहितीप्रमाणे वडोदरा शहर व त्या परिसरातून वाहणाऱ्या विश्वामित्री आणि धाधहर नद्यांजवळील मानवी वस्त्यांमध्ये मगरी सापडणं अत्यंत सामान्य बाब झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या भागात आलेल्या पुरात येथून तब्बल 76 मगरी पकडल्या होत्या.
 
पावसाळ्यात किंवा नदीतील पाणी कमी झाल्यावर अनेकदा मगरी मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करतात. तसेच येथील कुत्र्यांना आणि गायींना जखमी करण्याच्या घटनाही घडल्या आहेत.