मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (14:38 IST)

दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून विराट कोहलीची निवड

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विजडन अमॅलनाकने 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून तची निवड केली आहे. सचिनला 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू, तर कपिल देवचा 80 दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.
 
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने दशकातील  पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आला आहे.
 
भारतीय कर्णधार विराट कोहलीने 2008 साली एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 254 एकदिवसीय सामन्यात 12 हजार 169 धावा केल्या आहेत.
 
विश्वचषक 2011 च्या विजेता संघाचा सदस्य असलेल्या विराटने दहा वर्षात 11 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्यात 42 शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 90 च्या दशकात केलेल्या कामगिरीसाठी सचिनची निवड करण्यात आली आहे. त्याने 1998 मध्ये 9 शतके झळकावली होती. तर कपिल देवला 80 च्या दशकातील कामगिरीसाठी मान देण्यात आला आहे. कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघाने 1983 साली भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या दशकात कपिलने सर्वाधिक गडी बाद केले होते.
 
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सची सलग दुसर्या  वर्षी सर्वोत्कृष्ट क्रिकेटर म्हणून निवड केली आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी महिला सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर म्हणून गौरव करण्यात आला तर वेस्ट इंडीजच्या कीरॉन पोलार्डला सर्वोत्कृष्ट टी 20 क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.