शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (18:56 IST)

Lockdown : ऑनलाईन क्लासेसचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांचे ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत जेणे करून लॉक डाऊन मुळे त्यांच्या अभ्यासावर त्याचा काही उलट परिणाम होऊ नये. मुलांना देखील आता ऑनलाईन क्लासेस आवडू लागले आहेत. शिक्षकांकडून त्यांना प्रकल्प देखील दिले जात आहे.ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू आहे, गोष्टीच्या दोन बाजू असतात त्याच प्रकारे ऑनलाईन क्लासेस मुलांसाठी फायदेशीर ठरत आहे तसेच त्याचे काही तोटे देखील दिसून येत आहे. चला ऑनलाईन क्लासेसचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ या.  
 
सर्वप्रथम फायदे जाणून घेऊ या -
 
* मुलांना बाहेर कोचिंगसाठी जावे लागत नाही त्यामुळे त्यांचा येण्याचा आणि  जाण्याच्या वेळ वाचत आहे. 
 
* ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांना थकवा येत नाही आणि ते घरातच व्यवस्थित अभ्यास करत आहे. 
 
* एकांतात मुलांचा अभ्यास चांगला होत आहे.
 
* मुलं संपूर्ण वेळ पालकांच्या दृष्टी समोर असतात सुरक्षेच्या दृष्टीने हे खूपच फायदेशीर आहे. तसेच मुलांच्या अभ्यासाकडे देखील पालकांचे लक्ष दिले जाते. 
 
ऑनलाईन अभ्यासाचे तोटे जाणून घेऊ या-     
 
* मुलांना क्लास सारखे वातावरण मिळत नाही.
 
* ऑनलाईन क्लासेसमध्ये शिक्षकांशी संवाद साधता येत नाही. 
 
* मोबाईल लॅपटॉप चा वापर वाढला आहे या मुळे मुलांच्या डोळ्यांवर त्याचा दुष्प्रभाव पडत आहे. 
 
* जिथे पालक आपल्या मुलांना मोबाईल हाताळायला देत नव्हते तर आता मुलांना मोबाईलचाच वापर करावा लागत आहे. 
 
* ऑनलाईन क्लासेस बऱ्याच काळ सुरु असतात आणि त्यामुळे मोबाईल देखील उष्ण होतात अशा परिस्थितीत मोबाईल फाटून अपघातात होण्याची शक्यता असते.