शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (22:40 IST)

होम आयसोलेशन मध्ये आपली खोली आणि दिनचर्या कशी असावी जाणून घेऊ या

कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने आणि झपाट्याने वाढत आहे. या संसर्गापासून बचाव करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. या साठी लॉक डाऊन चे पालन करणे आपले कर्तव्य आहे काही लोक रुग्णालयात दाखल होऊन या आजारावर उपचार घेत आहे तर काही  लोक होम आयसोलेशन म्हणजे गृह विलगीकरण मध्ये राहूनच या आजारावर उपचार घेत आहे. होम आयसोलेशन मध्ये राहणाऱ्या रुग्णांना काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे आहे.चला तर मग जाणून घेऊ या.
* एखादी व्यक्ती होम आयसोलेशन मध्ये असेल तर लक्षात ठेवा की घरातील वडीलधारी आणि मुलांच्या संपर्कात ते येऊ नये. 
 
* कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांची खोली वेगळी असावी.त्याचे अंथरून,पांघरून,जेवण्याची भांडी वेगळी असावी. 
 
* घरातील एखादी व्यक्ती रुग्णाच्या खोलीच्या संपर्कात आला असेल तर त्यांनी आपले हात चांगले धुवून  घेतले पाहिजे. 
 
* रुग्णाच्या खोलीत जातांना ट्रिपल लेयर मास्क घालावा. 
 
* रुग्णांची भांडी स्वच्छ करताना ग्लव्स घालूनच भांडी स्वच्छ करावी. ग्लव्स काढून साबणाला देखील स्वच्छ करावे. 
 
* रुग्णांनी आपल्या आरोग्याचे निरीक्षण स्वतःला करायचे आहे. आपल्या तापमानाची तपासणी स्वतःच करावी.  
    
* सर्वात महत्त्वाचे म्हणजे की जी व्यक्ती गृह विलगीकरण मध्ये आहे त्याला सकारात्मक विचार द्या की तो लवकर बरा होईल. नकारात्मक विचार येऊ देऊ नये.