सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (09:50 IST)

त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि मग ..

कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ बेड व आरोग्य सुविधा उपल्बध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने पालिकेने ठिकठिकाणी वॉर रूम सुरू केले आहेत. मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने  मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी, स्वतः दहिसर वॉर रूमला तीन वेळा संपर्क केला मात्र दाद मिळाली नाही. चौथ्यांदा फोनला प्रतिसाद लाभला. त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि तेथील कर्मचारी वर्गाला चांगलेच झापले.
 
मी स्वतः नागरिकांच्या तक्रारींबाबत खातरजमा करण्यासाठी दहिसर वॉर रूममध्ये चार वेळा फोन केल्यावर त्यास प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. या वॉर रूममध्ये नागरिकांच्या तक्रारींना दाद दिली जात नाही, हे खरे ठरल्याचे महापौरांनी सांगितले. मी महापौर असूनही तुम्ही मला अशी वागणूक देत असाल तर सर्व सामान्यांना काय वागणूक देत असाल याची कल्पना येते. मुंबईकर खूप त्रस्त आहेत. त्यांना अधिक त्रास देऊ नका. त्यांना सर्व सुविधा नीट मिळाल्याच पाहिजे, या शब्दात महापौरांनी तेथील कर्मचा-य़ांना सुनावले.