मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (12:17 IST)

मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. 
 
लस संपण्याच्या भीतीमुळे लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की लस नसल्याने बीकेसी, मुलुंडमध्ये लसीसकरण बंद करण्यात आलं आहे. अनेक केंद्रांवर लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं असून लोकांना वाचवणे जास्त गरजेचं आहे मग ते देशातील असो राज्यातील वा मुंबईतील असो.

लोकसंख्येप्रमाणे लसींचं वाटप झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.