शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 5 मे 2021 (17:12 IST)

होम आयसोलेशन मध्ये असताना ही काळजी घ्या

कोरोना बाधित असल्यास डॉक्टर होम आयसोलेशन किंवा गृह विलगीकरणचा सल्ला देत आहे. कोविड चे तीन नियम आहे -मास्क घालणे, सेनेटाईझरचा वापर करणे आणि वर्दळीच्या ठिकाणाहून लांब राहणे. होम आयसोलेशन मध्ये असल्यावर देखील काही काळजी घ्यावयाची आहे. नाही तर आपले सर्व कुटुंब संक्रमित होऊ शकत. चला जाणून घेऊ या की काय खबरदारी घ्यावयाची आहे. 
 
* संसर्ग हवेतून पसरत आहे- 
कोरोनावरील सुरु असलेल्या संशोधनात हे नवीन संशोधन सामोरी आले आहे लासेन्ट पत्रिकेच्या संशोधनात हे आढळून आले आहे की हा विषाणू हवेतून अधिक वेगाने पसरत आहे. ज्याला इरासोल ट्रान्समिशन असे म्हणतात. या पूर्वी हे ड्रॉपलेट ट्रान्समिशन म्हणजे तोंडातून निघणाऱ्या थुंकीच्या थेंबांमधून एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमणाद्वारे प्रसारित केले जाते. 
 
* घरात खबरदारी घ्या- मीडियाशी चर्चा करताना दिल्ली एम्सचे निदेशक डॉ.रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की जर आपण घरातच आयसोलेट आहात तर मोकळ्या खोलीत राहावे. घरातील खिडक्या उघड्या ठेवा. कारण बंद खोलीत संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते. 
 
* घरात अंतर राखा - संपूर्ण कुटुंब घरातच असलेलं तरीही अंतर ठेवा. घरातील एखादा सदस्य संक्रमित असल्यास त्याला एका वेगळ्या खोलीत ठेवा. हे समजून घेऊ नका की तो आपल्यापासून 10 ते 15 फुटाच्या अंतरावर आहे. तर आपल्याला काहीच भीती नाही तर असे काही नाही. जो पर्यंत रुग्णाचा चाचणीचा अहवाल नकारात्मक येतं नाही त्याच्या समोर जाऊ नका.
 
* एसी चा वापर कमी करा- तज्ञ म्हणतात की एसी चालवताना पूर्ण खोली बंद केली जाते. अशा परिस्थतीत एरोसोल कण साचण्याची शक्यता असते. म्हणून शक्य असल्यास बंद खोलीत कमीच बसा. 
 
* आपण गृह विलगीकरण मध्ये असाल तर हे लक्षात ठेवा की खोली मोकळी हवेदार असावी. खिडक्या नसतील तर खोलीतील तावदाने उघडून द्यावे. जेणे करून हवा बाहेर निघेल. स्नानगृहात देखील तावदान असावे.जर तावदान नसतील तर वेळोवेळी स्नानगृह स्वच्छ करावे. स्वछतागृहात जाताना मास्कचा वापर करा आणि स्वच्छतेची पुरेपूर काळजी घ्या.