गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : सोमवार, 29 नोव्हेंबर 2021 (17:12 IST)

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.

वर्क फ्रॉम होम मध्ये आपण बऱ्याच काळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसून काम करतो, या मुळे शरीरात वेदना, खांद्यात वेदना, मानेत आणि पाठीत वेदना होते आणि यामुळे रात्री झोप येत नाही. या पासून वाचण्यासाठी स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु यासाठी कामाला मधून सोडणे अशक्य असते. आपण योगाने या समस्येला दूर करू शकता. हे आपण जागेवर बसून देखील करू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
 
सर्वप्रथम आपल्या मनगटाला आणि बोटांना स्ट्रेच करा म्हणजे ताणून घ्या. या साठी एका हाताचे बोट दुसऱ्या हाताच्या तळहातात न्या त्याच हाताला पुढे करा खांद्याच्या उंचीपर्यंत हाताचे बोट मनगटाच्या मागे ओढून धरा जो पर्यंत आपल्याला  हळुवार पणे खेचल्याची जाणीव होईल.
 
मनगट आणि बोट ताणून घ्या या साठी आपल्याला पहिल्या स्टेप प्रमाणे  करायचे आहे. अंतर एवढेच आहे की ओढताना प्रत्येक बोट एक एक करून मागे ओढायचे आहे.
 
मानेच्या स्ट्रेचिंग साठी सर्वप्रथम वर बघा नंतर खाली बघा नंतर उजवी कडे-डावी कडे आपली मान फिरवा.
 
खांद्यासाठी-आपण आपल्या खांद्याला वर खाली करा. नंतर मागे पुढे हळुवार करा. या मुळे आपल्याला खांद्याच्या वेदनेपासून आराम मिळेल.
 
बसूनच ताडासन करा- या साठी आपले दोन्ही हात वर घ्या आणि तसेच राहू द्या नंतर हे 1,2 वेळा पुन्हा करायचे आहे.
 
ताडासना नंतर साईड स्ट्रेचिंग करा. या साठी आपला उजवा हात डाव्या बाजूस न्या आणि हीच स्टेप पुन्हा दुसऱ्या हाताने करा.