पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दोन व्यायाम
वाढलेले पोट कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम याचे संतुलन असावे. नुसंत डायट करण्याने फायदा होत नसतो. आपल्याला समस्या सोडवायची असल्यास तास-न-तास व्यायाम करण्याची गरज नाही केवळ दोन सोपे योगासन करुन आपण पोटावरील चरबी कमी करु शकतात. पोटाचा घेर कमी करण्यासाठी आज आम्ही आपल्याला दोन व्यायाम सांगत आहोत-
पश्चिमतानासन
पश्चिमतानासन केल्याने संपूर्ण भार पोटावर येत असल्यानं पोट कमी करण्यासाठी मदत मिळते. या आसनामध्ये पायाच्या टाचेपासून डोक्यापर्यंत शरीराचा पाठीकडील भाग ताणला जातो.
पाय पसरून दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवा.
पोट, छाती, डोके आणि हात तुमच्या शरीराच्या लवचिकतेनुसार खाली करा.
दोन्ही हातांच्या तर्जनीनं पायांचे अंगठे धरा.
कपाळ गुडघ्यावर, हातांचे कोपरे जमिनीवर टेकावं.
गुडघे मोडू नये.
शक्य नसल्यास शरीरावर अनावश्यक जोर देऊ नये.
पाठदुखी, स्पाँडिलॉसिस, हर्निया, हॅड्रोसिलचा त्रास असल्यास हे आसन करू नये.
पवनमुक्तासन
पवनमुक्तासन म्हणजे मुक्त होण्याची स्थिती. या आसनामुळे गॅसेसची समस्या नाहीशी होते. पोटाचं आरोग्य सुधारतं. या आसानमुळे पोटावर ताण निर्माण होतो. ज्याने पोटातील वायू बाहेर येण्यास मदत मिळते. याने पोटावरील चरबी देखील कमी होण्यास मदत होते.
पाठीवर झोपून दोन्ही पाय एकमेकांजवळ आणावे.
दोन्ही पाय ३० सेंटिमीटरपर्यंत वर उचलून गुडघ्यात दुमडा
दुमडलेले गुडघे छातीच्या जवळ आणा.
हाताने धरुन गुडघे छातीवर हलके दाबा.
नंतर डोके वर उचला.
हनुवटीनं गुडघ्यांना स्पर्श करा.
हर्निया, पाठदुखी, मानदुखी असल्यास हे आसान करणे टाळावे.
नोट: योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करावे.