गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (18:25 IST)

पश्चिमोत्तानासन स्त्रियांसाठी प्रभावी असणारे आसन

Do this yoga pose to reduce hip fat
पश्चिमोत्तानासन बसून केले जाणारे आसन आहे. नियमितपणे या आसनाचा सराव करणाऱ्याच्या पाठीचा कणा वाकत नाही. स्त्रियांसाठी हे आसन फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर आणि प्रभावी आहे. याचा नियमितपणे सराव केल्याने गर्भाशय आणि मासिक पाळी संबंधित तक्रार कमी होतात. निद्रानाश सारखे त्रास देखील कमी होतात. चला तर मग पश्चिमोत्तासन करण्याची पद्धत आणि या आसनाचे  फायदे जाणून घेऊ या. 
कसं करावे- 
सर्वप्रथम दोन्ही पाय लांब करून जमिनीवर बसा. पायाचे बोट एकत्र करून जोडून ठेवा. दीर्घ श्वास घेत हात वर करून शरीराला शक्य तितके वाकवून पायाची बोटे धरण्याचा प्रयत्न करा. शरीर एवढे वाकवा की डोकं गुडघ्याला स्पर्श झाले पाहिजे. शक्य असेल तरच करा. आपण आपल्या क्षमतेनुसार हे आसन करावे. 
पश्चिमोत्तानासन चे फायदे- 
या आसनाचा नियमित सराव केल्याने मनाला शांतता मिळते आणि तणाव कमी होतो.पचन तंत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी आपण या आसनाचा सराव दररोज देखील करू शकता.या आसनामुळे उच्च रक्तदाब,निद्रानाश आणि वंध्यत्वचा उपचार केला जाऊ शकतो.  
हे आसन केल्याने पोट आणि कुल्ह्याची चरबी कमी होते. पोट आणि कुल्ह्याची चरबी कमी करण्यासाठी हे आसन खूप फायदेशीर आहे.कुल्ह्याची चरबी कमी करण्यासाठी हे योगासन नियमितपणे करा.