मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (08:10 IST)

दात दुखी असल्यास हे 5 घरगुती उपचार आराम देतात

दातांमध्ये वेदने चे अनेक कारणे असू शकतात. दातात वेदने चे कारणे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तरच आपण यावर काही उपचार घेऊ शकता.  
 
घरगुती उपचार आश्चर्यकारक असू शकतात, या मध्ये नियमितपणे मिठाच्या पाण्याचे गुळणे करणे आणि कोल्ड कम्प्रेस शेक समाविष्ट आहे. सामान्यतः हे किरकोळ दुखण्यावर प्रभावी असू शकते. परंतु दातदुखी तीव्र असल्यास दंत चिकित्सक कडून तपासणी करणे आवश्यक आहे. दातात जास्त दिवस वेदना किंवा त्रास जाणवत असल्यास दंत चिकित्सकांच्या परामर्श घ्यावा. दातदुखीवर काही घरगुती उपाय आहे चला तर मग ते जाणून घेऊ या. 
 
1 कांदा -कांद्याचा वापर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी केला जातो .या मध्ये अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म आढळतात. जे प्रभावित भागाची सूज कमी करण्यात आणि बेक्टेरियाशी लढण्यात मदत करतो. या मध्ये फायटोकेमिकल्स असतात जे वेदना देणाऱ्या जंतूंना काढून टाकतात. या साठी कच्चा कांदा चावावा लागेल, दातात वेदना होत असल्यास कांदा चिरून चावावा. 
 
2 मिठाच्या पाण्याचे गुळणे करा- 
मिठाच्या पाण्याचे गुळणे केल्याने तोंडातील जिवाणू नाहीसे होतात. या पाण्यात जंतुनाशक गुणधर्म असतात. जेव्हा दात हिरड्यापासून तुटतात तर त्या क्षेत्राच्या भोवती जिवाणू तयार होतात. जे वेदनेला कारणीभूत असतात. या मुळे वेदने पासून मुक्ती मिळते. हिरड्यांची सूज कमी होते 
 
3 लवंग - 
दाताच्या दुखण्याला लवंग प्रभावी घटक आहे. लवंगाचे तेल वेदनेपासून त्वरितच आराम मिळवून देतात. या मध्ये युजेनॉल नावाचे रसायन आहे जे बेक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतात. हे वेदनेमध्ये भूल देण्याचे काम करतो. हे जागेला सुन्न करतो. या लवंगाच्या तेलात अँटी इंफ्लिमेंटरी गुणधर्म आढळतात जे बेक्टेरिया दूर करतात आणि सूज कमी करतात. 
 
4 टी बॅग -
हिरड्यामधून दात तुटल्यावर सूज येऊ शकते. ही सूज कमी करण्यासाठी टी बॅग प्रभावी आहे. चहा मध्ये टॅनिक ऍसिड असत. ज्यात अँटी बेक्टेरियल आणि अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म असते. ही टी बॅग्स सूज कमी करण्यात आणि बेक्टेरिया संक्रमणास प्रतिबंधित करण्यास प्रभावी ठरते. 
 
5 आईस पॅक -
सूज कमी करण्यासाठी आणि दाताच्या दुखण्याला कमी करण्यासाठी आईस पॅक लावणे प्रभावी उपाय आहे . यामुळे दाताच्या वेदनेला आराम मिळतो.हे पॅक प्रभावित क्षेत्राला सुन्न करतो या मुळे वेदना कमी होते.