शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (08:30 IST)

झोपेत बोलण्याची सवय असल्यास हे उपाय अवलंबवा

आजच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक आजार होऊ शकतात. बऱ्याच लोकांना झोपेत बोलण्याची सवय असते .ही सवय दुर्लक्षित केल्यावर त्रासदायी होऊ शकते जर आपल्याला देखील असा त्रास आहे तर हे टाळण्याचे काही उपाय सांगत आहोत  चला तर मग जाणून घेऊ या. 
 
लोक झोपेत का बोलतात?
बऱ्याच वेळा काही लोक  झोपेत अस्पष्ट बोलतात तज्ज्ञ सांगतात  की असे स्लीपिंग डिसऑर्डर असल्यामुळे होत हे लोक झोपेत बोलतात. लहान मुलं आणि वयोवृद्धांमध्ये ही सवय बघण्यात आली आहे. ह्याला पेरासॉम्निया असे म्हणतात.
 
लक्षणे कोणती आहे- 
 
बदललेल्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे माणूस झोपेत बोलतो. बऱ्याच वेळा तणाव असल्यामुळे देखील लोक झोपेत बोलतात. मेंदूवर अधिक ताण दिल्यामुळे माणूस समस्येमध्ये अडकतो. शरीराला आराम मिळत नाही. झोपेची वेळ चुकीची असल्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो. 
 
काय करावं -
हे टाळण्यासाठी सर्वप्रथम तणाव मुक्त राहावं. झोपण्याची वेळ आणि पद्धतीकडे लक्ष द्यावे.पोटावर न झोपता पाठीवर झोपावं. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि व्यायाम करा. जेणे करून शरीर तंदुरुस्त राहील आणि  झोपेत बोलण्याची सवय लागणार नाही. 
 
झोपण्याच्या पूर्वी हात-पाय स्वच्छ करा-  
 
या शिवाय आपण दररोज झोपण्याच्या पूर्वी हात-पाय स्वच्छ करून झोपा. असं म्हणतात की हात-पाय घाण असल्यामुळे वाईट स्वप्ने येतात आणि या मुळे लोक स्वतःच्या मनाशी बोलतात. तसेच बेड देखील स्वच्छ करून झोपावं. अधिक त्रास असल्यास त्वरितच डॉक्टरांशी संपर्क साधावा.