केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी कडीपत्ता आणि मेथीचे मास्क बनवा
कडी पत्ता आणि मेथी हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे या शिवाय कडीपत्ता अन्नाची चव वाढविण्यासाठी फोडणी देण्यास वापरतात. ह्याचा वास देखील इतका छान असतो की त्याचा प्रभाव दूरगामी पडतात. मेथी ही पोषक घटकांनी समृद्ध असत जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे दोन्ही आरोग्यासाठी आणि त्वचे आणि केसांसाठी फायदेशीर आहे. ह्याचे मास्क बनवून केसांची वाढ करतात. तसेच केस पिकणे होण्या पासून रोखतात.
कडी पत्ता केसांसाठी फायदेशीर-
कडी पत्ता अँटी ऑक्सीडेन्ट ने समृद्ध आहे. हे अँटी ऑक्सीडेन्ट, स्कॅल्प ला मॉइश्चराइझ करतात आणि मृत छिद्र काढून टाकतात. या शिवाय कडीपत्ता फायदेशीर आहे कारण ते बीटाकेरोटीन आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात. जे केसांच्या गळती आणि पातळ होण्यापासून रोखतात. प्रथिन केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. कडीपत्ता अमिनो ऍसिड ने समृद्ध आहे जे केसांच्या फायबर बळकट करतात.
मेथी केसांसाठी फायदेशीर -
मेथी स्कॅल्प आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ह्याचा नियमित वापर केल्यानं केस लांब,घनदाट आणि मऊ होतात. तसेच केसांची गळती कमी होते आणि केसांची वाढ होते.
मेथी आणि कडीपत्ता मास्क-
या मास्क ला बनविण्यासाठी कडीपत्ता आणि मेथीसह आवळा देखील मिसळा.
साहित्य -मेथीची पाने अर्धा कप, कडीपत्ता अर्धा कप, आवळे 2
कृती -सर्वप्रथम
कडीपत्ता आणि मेथीचे पाने तोडून धुऊन घ्या. हे दोन्ही पाने मिक्सर मध्ये वाटून घ्या. आवळा किसून मिसळा.पेस्ट तयार करा. केसांचे दोन भाग करून हेयर पॅक पूर्ण केसांना लावा स्कॅल्प मध्ये मसाज करत केसांच्या टीप पर्यंत लावा.पॅक लावल्यावर शॉवर कॅपने झाकून घ्या. 30 मिनिटे तसेच लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुऊन घ्या.केसांना कंडिशनर किंवा शॅम्पू करण्याची काहीच गरज नाही.
आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरल्याने केसांची गळती आणि कोंड्याची समस्या नाहीशी होते. कडीपत्ता आणि मेथी ने बनविले हे मास्क किंवा पॅक पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे हे केसांचे सौंदर्य वाढविण्यात कारागार आहेत.
* टीप -हे वापरण्यापूर्वी केसांशी निगडित कोणते ही त्रास असल्यास तज्ज्ञाचा सल्ला आवर्जून घ्यावा.