रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (18:23 IST)

या योगासनाने शरीर लवचिक होईल

शरीर लवचिक करण्यासाठी ,वजन कमी,करण्यासाठी,आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी योगाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हे आसन पायाची मजबूती वाढवतात, पचन शक्ती चांगली करतात. तणावापासून मुक्ती मिळते. म्हणून योगाला आपल्या दैनंदिनेचाएक भाग बनवा. योगाभ्यास करताना हे लक्षात ठेवा की योग नेहमी हळू हळू करा. आपल्या क्षमतेनुसार योगा करा.  
 
चक्की चलनासन  -या आसनाचा उगम जुन्या काळात हाताने चालणाऱ्या जात्या पासून झाला. म्हणून याला दळणासन असे ही म्हणतात. या आसनाला जात्या फिरविल्या प्रमाणे केले जाते.  
 
कस करावं - हे आसन करायला खूप सोपं आहे. या साठी आपण जमिनीवर चटई अंथरून बसा.पाय समोर पसरवून घ्या. बसल्यावर दोन्ही हात जोडत पाय जवळ आणा म्हणजे आपल्या समोर आणा आणि घड्याडीच्या काटाच्या दिशेने हात फिरविणे सुरु करा. ज्या प्रमाणे जात फिरवले जाते. अशा प्रकारे घड्याडीच्या विरुद्ध दिशेने देखील फिरवा. सुरुवातीला आपण हे किमान 10 मिनिटे तरी करावे. 
 
फायदे- 
या आसनाचा सर्व करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की या मुळे पोटाचा घेरा कमी होतो. पोटाच्या आकाराला चांगले रूप देण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. कंबर देखील लवचिक होते.