1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : गुरूवार, 14 जुलै 2022 (13:31 IST)

Yoga for High BP या आसनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नाहीशी होते

yoga
योगासनांमध्ये शवासन हे सोपे मानले आहे. याला शवासन म्हणतात कारण हे केल्याने शरीराची मुद्रा एखाद्या मेलेल्या प्रेतासमान दिसते. शवासन शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले मानले आहे. योगासनं करताना हे आसन सर्वात शेवटी केले जाते. या मुळे शरीर आरामाच्या अवस्थेत राहून मेंदू शांत राहील. चला तर मग शवासन करण्याची पद्धत आणि याचे फायदे जाणून घ्या. 
 
पद्धत- 
हे करण्यासाठी पाठीवर झोपा हाताला शरीरापासून एक फुटाच्या अंतरावर ठेवा. पायात देखील अंतर ठेवा. हात आणि बोटांना आकाशाकडे ठेवा. शरीर आरामाच्या अवस्थेत ठेवा. डोळे मिटून घ्या आणि हळू हळू श्वास घ्या आणि सोडा. या अवस्थेत दोन मिनिट तसेच राहा.
 
फायदे- 
* शवासन केल्याने तणाव कमी होतो.
* शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करतो. 
* उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 
* हृदय विकार असणाऱ्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. 
* अस्वस्थता जाणवत असल्यास शवासन महत्त्वाची भूमिका बजावतो. 
 
* सावधगिरी- हे आसन करताना कोणतीही खबरदारी घेण्याची गरज नाही. या आसनाचा सराव कोणीही सहज करू शकतो. गरोदर स्त्रियांसाठी हे आसन करणे चांगले आहे. इतर आजाराने वेढलेल्या रुग्णांनी देखील या आसनाचा सराव करावा.