गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated: शनिवार, 23 जुलै 2022 (14:07 IST)

YogaTips शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा, शरीराची शक्ती- एकाग्रता वाढते

YogaTips दिवसभर व्यवस्थित काम करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जाची आवश्यक असते.शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्यासोबतच नियमित योगासने आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योगा-व्यायामाचा  नियमित सराव करून शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता. सर्व वयोगटातील लोकांनी त्यांच्या क्षमतेनुसार रोज योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ऊर्जावान वाटण्यासाठी फक्त तंदुरुस्त असणे पुरेसे नाही तर त्यासाठी एकाग्रता आणि मनःशांती देखील आवश्यक आहे. या योगासनांचा नित्यक्रमात समावेश केल्यास अनेक फायदे होतात.चला तर जाणून घ्या. 
 
1 माउंटन पोज किंवा पर्वतासन योग-
योग तुमच्यासाठी शरीर जागरूकता वाढवण्यासाठी आणि शारीरिक असंतुलन सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ही योगासने नियमित केल्याने शरीराची मुद्रा तसेच रक्ताभिसरण बरोबर राहते. डोक्या पासून पायापर्यंतचे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी पर्वतासन योगाचा नियमित सराव करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 
 
2 नौकासन योग -
 नियमितपणे नौकासन योगाचा सराव करणे सर्व वयोगटातील लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. हे आसन शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि पोटाच्या स्नायूंना चांगले ताणण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. पोटाचे आणि पायांचे स्नायू मजबूत करण्यासाठी आणि शरीर सक्रिय ठेवण्यासाठी हा योग नियमितपणे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
 
3 पश्चिमोत्तनासन योग-
पश्चिमोत्तनासन योग तुमच्या हॅमस्ट्रिंग्सच्या स्नायूंना ताणण्यासह चांगले रक्त परिसंचरण राखण्यास मदत करतो. पश्चिमोत्तानासन योगाचा सराव मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी, मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या योगाचा नियमित सराव शरीर आणि मन दोन्हीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.