सोमवार, 15 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (12:53 IST)

धक्कादायक बातमी ! मृतांच्या यादीत 216 जिवंत लोक

Shocking news! The list of dead includes 216 living people धक्कादायक बातमी ! मृतांच्या यादीत 216 जिवंत लोक  Marathi Regional News In Webdunia Marathi
कोरोनामुळे  मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून50 हजार रुपयांची मदत केली जात आहे. पैशांसाठी बीड मध्ये अंबाजोगाई येथे चक्क मृतांच्या यादीत 216  जिवंत लोकांचा समावेश करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आला आहे. 
 सध्या कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत करण्यात येत आहे. राज्य सरकार कडून ही  आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. ही माहिती आरोग्य  विभागाच्या पोर्टेलवर नोंदली जात आहे. या पोर्टल वर अंबाजोगाईत कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या संख्ये पेक्षा अधिक ची माहिती आणि यादी तहसीलदारांकडे आली होती. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती मिळविण्यासाठी मृतांच्या घरी जाऊन चौकशी करताना ज्या व्यक्तींची नावे मृतांच्या यादीत आहे ते जिवंत असल्याचे उघडकीस आले .त्यामुळे हा धक्कादायक फसवेगिरीचा प्रकार कळला .