रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 4 डिसेंबर 2021 (14:33 IST)

पहिल्यांदाच इन्क्युबेटरमध्ये मोराचा जन्म

पिंगळी गावातील सुरेश शिंदे या शेतकऱ्याला शेतातील बांधावर लांडोरीची अंडी सापडली तेव्हा त्यांनी ही अंडी पिंगोरीतील इला फाऊंडेशनकडे आणून दिली. त्यानंतर या अंड्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यात आलं. आणि काही दिवसांनी या अंड्यातून मोराची चार गुटगुटीत अशी पिल्ले बाहेर आली. माणसांच्या हाती एकदा अंडी लागली तर लांडोर देखील त्यांना सांभाळत नाही आणि ती अंडी नष्ट करते. त्यामुळे या पिल्लांना जीवदान मिळाल्याचं बोललं जातेय. महाराष्ट्र वनविभाग आणि इला फाउंडेशनच्या वतीने पिंगोरी गावात ‘इला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर’मध्ये इन्क्युबेटर सेंटर चालवलं जातं. शिंदे यांनी अंडी आणून दिल्यानंतर इला फाउंडेशन यांनी जबाबदारीनं आपलं काम बजावलं. या पिल्लांची इला फाउंडेशनने काळजी घेतली असून, तिथेच ती वाढत आहेत. पण कृत्रिम अंडी उबवण केंद्रात मोरांना जन्म देण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती या केंद्राने दिली आहे.